वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहतूक नियमनासाठी जंक्शन बॉक्सची अभिनव संकल्पना

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17एप्रिल 2023

नवी मुंबई शहरात वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा मध्यवर्ती मुख्य चौक असून येथे वाहतुकाची नेहमी वर्दळ असते. या वाहतुकीचे नियमन करण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना वाहतूक पोलीस विभागाचे अभिप्राय घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी विभागामार्फत करण्यात येत असतात.

अशाच प्रकारची ‘जंक्शन बॉक्स’ ही एक अभिनव संकल्पना वाहतूक नियमनाच्या दृष्टीने महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राबविण्यात आलेली आहे.

जंक्शन बॉक्सव्दारे वाहतुकीचा प्रवाह सुयोग्य रितीने नियंत्रित होणार असून सहसा वाहनांची वर्दळ असलेले व्यस्त चौक, क्रॉस रोड्स, टी – जंक्शन्स अशा ठिकाणी ते बसविले जातात. ज्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण करणा-या ट्रॅफिक सिग्नलसारख्या नियंत्रण व्यवस्था उपलब्ध असूनही वाहतूक सुरळीत राहत नाही व स्थीर वाहने अडथळा निर्माण करतात त्याठिकाणी बॉक्स जंक्शनचा मोठया प्रमाणावर उपयोग होतो.

जंक्शन बॉक्समध्ये वाहनांना थांबण्यास प्रतिबंध असल्याने जंक्शन नेहमी मोकळे राहतात आणि वाहतूक सुरळीत होण्यास मदत होते. जंक्शन बॉक्सबाबत कोड ऑफ प्रॅक्टीस रोड मार्किंग अंतर्गत नियमाची तरतूद आहे.

========================================================

अविरत वाटचाल  YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र