- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 17 एप्रिल 2023
वैद्यकीय क्षेत्रातील तसेच सामाजिक चळवळीतील अतुलनीय योगदान देणाऱ्या उच्च विद्याविभूषित डॉ. सुदर्शन रणपिसे यांचा जीवनगौरव समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 11 एप्रिल रोजी वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या शानदार कार्यक्रमात डॉ. सुदर्शन रणपिसे यांना हा पुरस्कार आरपीआय, राष्ट्रीय संपर्क प्रमुख विनोद निकाळजे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. शाल, पुष्पगुच्छ व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण कृती पुतळा असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती नेरूळ नवी मुंबई आणि अध्यक्ष चंद्रकांत जगताप यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. डॉ. सुदर्शन रणपिसे यांना हा समाजभूषण पुरस्कार प्रदान करताना व्यासपीठावर त्यांच्या पत्नी सौ उर्मिला, मुलगी पेरीना व मुलगा शौर्य तसेच आरपीआय नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, ठाणे आरपीआय अध्यक्ष भास्कर वाघमारे, प्रवीण गांगुर्डे, नगराळे, कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत जगताप आणि मान्यवर उपस्थित होते.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत डॉ. सुदर्शन रणपिसे यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांच्या ज्ञानाचा समाजाला खूप मोठा फायदा होत असल्याची प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी केली.
या समाजात वावरतो, त्या समाजाकडून अशाप्रकारे सन्मान दिला गेल्यामुळे मी अतिशय आनंदी झालो आहे. तसेच यापुढेही माझ्या ज्ञानाचा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी उपयोग करीन, अशी ग्वाही समाजभूषण पुरस्कारप्राप्त डॉ. सुदर्शन रणपिसे यांनी दिली.
========================================================
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र