कुर्ला – वाशी हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत मेगाब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 8 एप्रिल 2023
 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशी कडे जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
 ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला आणि पनवेल – वाशी या भागांत विशेष लोकल चालविण्यात येतील.
हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे – वाशी/नेरुळ मार्गे ट्रान्सहार्बर मार्गावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मेन लाईनवर मेगाब्लॉक नाही.
 हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना त्यामुळे होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.
——————————————————————————————————
अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL


अविरत वाटचाल वर्तमानपत्र