अंगणेवाडी जत्रा, होळीसाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 29 जानेवारी 2023

कोकणातील अंगणेवाडी जत्रा तसेच होळी उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेच्या सहकार्याने कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक 01453/01454 लोकमान्य टिळक – सुरतकल- लोकमान्य टिळक साप्ताहिक विशेष गाडी.

1)01453/01454 लोकमान्य टिळक- सुरतकल साप्ताहिक गाडी  3 फेब्रुवारी ते 31 मार्च या काळात दर शुक्रवारी रात्री 10.15 मिनिटांनी लोकमान्य टिळक स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 ला सुरतकल स्थानकात पोहोचेल.

  1. गाडी क्रमांक 01454 सुरतकल- लोकमान्य टिळक ही विशेष गाडी 4 फेब्रुवारी ते 1 एप्रिल या काळात दर शनिवारी सायंकाळी 7.40 मिनिटांनी सुरतकलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2.25 ला लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

या विशेष साप्ताहिक गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भतकळ, मुकांबिका, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुलकी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

  • डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 17 डबे असून त्यामध्ये 1 टू टायर एसी, 3 थ्री टायर एसी, 8 स्लीपर कोच आणि 3 आसनव्यवस्था असणारे डबे जोडण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in किंवा NTES app  डाउनलोड करावे, असे रेल्वे प्रशासनानेतर्फे सांगण्यात आले आहे.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र