- अविरत वाटचाल न्यू जनेटवर्क
- मुंबई, 13 जानेवारी 2023-01
रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरूस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर तसेच टान्सहार्बर मार्गावर येत्या १५ जानेवारी रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी रविवारी विशेष वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.
माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.55 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यान
डाउन धीम्या मार्गावर वळवल्या जाऊन त्यांच्या संबंधित स्थानकांवर वेळापत्रकानुसार थांबतील. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या गाड्या मुलुंड येथे डाउन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येऊन वेळापत्रकानुसार त्यांच्या संबंधित स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर लाईन वगळून)
पनवेल/बेलापूर येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे करीता सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणेकरीता सुटणाऱ्या ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल.
ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ – खारकोपर दरम्यानच्या उपनगरीय रेल्वे सेवा वेळापत्रकानुसार धावतील.
========================================================
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र