112 हेल्पलाइन क्रमांकावर प्रत्यक्ष प्रतिसादाचा कालावधी कमी करणार  

नवी मुंबई पोलीस आयुक्त आयुक्त मिलिंद भारंबे यांची माहिती

  • स्वप्ना हरळकर/ अविरत वाटचाल
  • नवी मुंबई, 3 जानेवारी 2023

नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभागाच्या वतीने राज्यासह देशात ११२ हा क्रमांक मदतीसाठी सुरू करण्यात आला. याचे मुख्य केंद्र नवी मुंबईत महापे इथं आहे. या क्रमांकावर संपर्क साधून नागरिक पोलिसांकडे मदत मागू शकतात. काही तांत्रिक कारणांमुळे संपर्क साधणा-या व्यक्तीपर्यंत ही मदत वेळेवर पोहोचू शकत नाही. त्या व्यक्तीपर्यंत कमीत कमी वेळात पोहोचता यावे यासाठी नवी मुंबई पोलिसांच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत. नवी मुंबईत विशेषतः वाशी, पनवेल, उरण, या दाटीवाटीच्या भागात पोलिसांना संबंधित व्यक्तिपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा सध्याचा कालावधी निम्याहून कमी करत कमीत कमी वेळेत कसे पोहोचता येईल याबाबतचा आढावा घेतला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत हा कालावधी आणखी कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिली.

एखाद्या व्यक्तीने 112 या क्रमांकावर संपर्क साधून कॉल केल्यास तो कॉल नवी मुंबईतल्या नियंत्रण कक्षात जोडला जातो. त्यानंतर जीपीएस लोकेशद्वारे संबंधित व्यक्तीचा ठावठिकाणा निश्चित केला जातो. त्याच्या तक्रारीची संपूर्ण माहिती घेतली जाते आणि संबंधित जिल्ह्याला तो कॉल पुढे पाठवला जातो. त्यानंतर बीट मार्शलला ही माहिती पाठविली जाते. संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचून मदत केली जाते. या मदतीची माहिती पुन्हा कंट्रोल रूमला दिली जाते. त्यामुळे नागरिकांनी 100 क्रमांकाऐवजी 112 क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना तत्काळ मदत देता येते.

पोलीस, प्रशासन, अग्निशमन दल, रूग्णवाहिका, महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक या सर्वांना हा क्रमांकावरून कमीतकमी वेळते मदत मिळणे शक्य होते.

========================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमान पत्र