ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची माहिती
- अविरत वाटचाल न्यू नेटवर्क
- ठाणे, 3 जानेवारी 2023
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 2022-2023 चा कार्यक्रम घोषित केला आहे. या निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यामधील 12 मतदार केंद्रे असून आतापर्यंत 30 डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात 14 हजार 683 मतदारांनी नोंदणी केली आहे.
नामनिर्देशनपत्रे भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे 12 जानेवारीपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर अखेरपर्यंतच्या अंतिम मतदार यादीत जिल्ह्यातील 12 मतदान केंद्रनिहाय मतदारांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
अंबरनाथ – एकूण 1904 (स्त्री-820 व पुरुष-1084), भिवंडी – एकूण 1789 (स्त्री-726 व पुरुष-1063), भिवंडी (वज्रेश्वरी) – एकूण 83 (स्त्री-37 व पुरुष-46), कल्याण – एकूण 3037 (स्त्री-1366 व पुरुष-1671), कल्याण (डोंबिवली) – एकूण 1059 (स्त्री-322 व पुरुष-737), मुरबाड – एकूण 525 (स्त्री-368 व पुरुष-157), शहापूर – एकूण 860 (स्त्री-540 व पुरुष-320), शहापूर (शेणवे) – एकूण 234 (स्त्री-157 व पुरुष-77), ठाणे – एकूण 2169 (स्त्री -637 व पुरुष-1532), ठाणे (भाईंदर) – एकूण 726 (स्त्री-194 व पुरुष-532), ठाणे (वाशी) – एकूण 1620 (स्त्री-554 व पुरुष-1066), उल्हासनगर – एकूण 677 (स्त्री-195 व पुरुष-482) अशा एकूण 14 हजार 683 मतदारांची नोंदणी झाली आहे.
या निवडणुकीसाठी कोकण विभागा. विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी असून, ठाणे जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.
==================================================
- अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL
========================================================
- अविरत वाटचाल वर्तमानपत्र