हिवाळी / ख्रिसमससाठी कोकण रेल्वे मार्गावर ३६ साप्ताहिक विशेष ट्रेन धावणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,१५ डिसेंबर २०२२

हिवाळी/ख्रिसमस २०२२ मध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी, पनवेल/पुणे-करमळी दरम्यान विशेष शुल्कासह ३६ साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आहे.

  • लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी द्वि-साप्ताहिक विशेष (१६)
  1. गाडी क्रमांक ०१४५९  द्वि-साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १९ डिसेंबर २०२२ ते ११ जानेवारी २०२३ (८ सेवा) दर सोमवार आणि बुधवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक ०१४६०  द्वि-साप्ताहिक विशेष गाडी २० डिसेंबर २०२२ ते १२ जानेवारी २०२३ (८ सेवा) दरम्यान दर मंगळवार आणि गुरुवारी ९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री ९.३० वाजता पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि.

  • डब्यांची रचना

एक प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित आणि दोन जनरेटर व्हॅन.

  • पनवेल – करमळी साप्ताहिक विशेषांक (१०)
  1. गाडी क्रमांक ०१४४५७ साप्ताहिक विशेष पनवेल १७ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३ (५ सेवा) दर शनिवारी रात्री १० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता करमळी येथे पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक ०१४४८ साप्ताहिक विशेष गाडी  १७ डिसेंबर २०२२ ते १४ जानेवारी २०२३  (५ सेवा) दर शनिवारी सकाळी ९.२० वाजता करमळी येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल.
  • गाडीचे थांबे

रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

  • डब्यांची रचना

एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान द्वितीय श्रेणी.

  • पुणे– करमळी साप्ताहिक विशेष (१०)
  1. गाडी क्रमांक ०१४४५  साप्ताहिक विशेष पुणे येथून १६ डिसेंबर २०२२ ते १३ जानेवारी २०२३ (५ सेवा) दर शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजता सुटेल आणि करमळी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजता पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक ०१४४६  साप्ताहिक विशेष १८ डिसेंबर २०२२ ते १५ जानेवारी २०२३ पर्यंत (५ सेवा) करमळी येथून दर रविवारी सकाळी ९.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३५ वाजता पोहोचेल
  • गाडीचे थांबे

लोणावळा, कल्याण पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि.

  • डब्यांची रचना

एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

  • गाड्यांचे आरक्षण

विशेष ट्रेन क्र. ०१४४५ साठी बुकिंग विशेष शुल्कावर आधीच उघडले आहे आणि विशेष गाड्या क्रमांक ०१४४६, ०१४४७, ०१४४८, ०१४५९, ०१४६० विशेष शुल्कासह १६ डिसेंबरपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.coc.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

=============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप