- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, ८ डिसेंबर २०२२
नवी मुंबईतून ठाण्यात गेलेल्या आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपल्या कामाचा धडाका जोरदार सुरू केला आहे. नागरी कामांचा उरक असो वा अधिकाऱ्यांमध्ये आलेली शिथिलता याबाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या आयुक्त बांगर यांनी आता शहरातील विविध ठिकाणी उभ्या असलेल्या भंगारगाड्या तातडीने हटविण्याबाबत अधिकाऱ्यांना धडक आदेश दिले.
महापालिका आयुक्तांच्या आदेशानंतर जाग्या झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करीत भंगार गाड्या हटविण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार तीन हात नाका उड्डाणपुलाखालील भंगार दुचाकी उचलण्याची कारवाई नौपाडा वाहतूक विभागामार्फत करण्यात आली असून जप्त केलेल्या दुचाकी बाटा कंपाऊंड येथे जमा करण्यात आल्या.
दरम्यान, नागरिकांच्या समस्यांबाबत चालढकल करणाऱ्या कर्मचारीआणि अधिकऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा कडक शब्दात आयुक्त बांगर यांनी इशारा दिला आहे.
================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप