चार वर्षांच्या बालकावर ससून रूग्णालयात उपचार सुरू
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 1 डिसेंबर 2022:
पुणे शहरात पहिल्यांदाच ‘ जपानी एन्सेफलायटिस ‘ (जेई) अर्थात मेंदूज्वराचा रूग्ण आढळून आला आहे. वडगावशेरी येथे राहणा-या एका चार वर्षांच्या बालकाला या मेंदूज्वराची लागण झाली आहे.
या रूग्णाला सुरूवातील ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. त्यानंतर ताप जास्त वाढला. सुरूवातीला त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याचा एक हात आणि पायही कमकुवत झाला आहे. सध्या त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. एनआयव्ही कडून या रूग्णाच्या रक्ताच्या चाचणीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तो राहत असलेल्या परिसरातील रूग्णांचे ताप सर्वेक्षण केले जाणार आहे. परिसरातील डास उत्पत्ती स्थानेही शोधली जात आहेत.
‘ जपानी एन्सेफलायटिस ‘ (जेई) म्हणजे काय
हा विषाणूजन्य आजार असून मेंदूला होणारा संसर्ग आहे. हे विषाणू बाधित डुकरांमध्ये आढळून येतात. या डुकरांना चावलेला डास बालकांना चावल्यास मेंदूज्वराची शक्यता असते. 1 ते 15 वर्षांच्या बालकांमध्ये याची लक्षणे दिसून येतात.
—————————————–