मुंबईत मोटार अपघात न्यायालयात रक्तदान शिबिर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 1 डिसेंबर 2022:

बृहन्मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि या न्यायाधिकरणाची वकील संघटना यांच्यावतीने तसेच सेंट जॉर्जेस रुग्णालय यांच्या सौजन्याने उद्या २ डिसेंबर रोजी मुंबई येथे रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

रक्तदानाचे महत्व समाजामध्ये रुजविण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी या रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मुंबईतील मोटार अपघात न्यायालय, 9 हजारी सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस समोर, बोरीबंदर, मुंबई-9 येथे सकाळी 10 ते  दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. या शिबिरात न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि अन्य रक्तदात्यांना सहभाग घेता येणार आहे. तरी इच्छुक रक्तदात्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन बृहन्मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरण आणि वकील संघटनेच्यावतीने करण्यासाठी आले आहे.

——————————————-