आफ्रिकेतील मलावी आंबा एपीएमसीत दाखल

प्रती डझन बाराशे ते दीड हजार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 25 नोव्हेंबर 2022:

हापूस आंब्याप्रमाणेच असणारा आफ्रिकेतील मलावी आंबा भारतात दाखल झाला आहे. उद्यापर्यंत या वर्षीची पहिली ८०० पेट्या आंब्याची आवक मुंबई कृषी उत्पन्न समितीच्या फळ बाजारात दाखल होणार आहे. 3 किलोच्या एका पेटीची किंमत चार ते पाच हजारांपर्यंत असणार असून फळ मार्केटचे संचालक संजय पानसरे यांच्याकडे हा आंबा दाखल होणार आहे.

दक्षिण पूर्व आशियातील मलावी देशातील आंबा भारतात येवू लागला आहे. 2011 मध्ये मलावी देशातील शेतक-यांनी कोकणातल्या दापोली कृषी विद्यापीठातून आंब्याची रोपं तिथे नेली आणि जवळपास 400 एकरमध्ये या आंब्याची लागवड केली. या देशातील वातावरणही आंब्याला पोषक असल्याने आंब्यानाही हापूसचीच चव असते. नोव्हेंबर महिन्यात हा आंबा तयार झाल्यानंतर जगभरात तो विक्रीसाठी पाठवला जातो.

—————————————————-