- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, २५ नोव्हेंबर २०२२
ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन (टिसा) संस्थापक आणि चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स (कोसीआ)चे अध्यक्ष डॉ मधुसूदन तथा अप्पासाहेब खांबेटे यांच्या दुःखद निधनानंतर आयोजित शोक सभेत समाजातील विविध मान्यवरांकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. टिसा येथे आयोजित कऱण्यात आलेल्या या शोकसभेला ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर ,मुंबईसह राज्यभरातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह अप्पांच्या आप्तेष्ट मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
येळी आ. संजय केळकर, ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड, टीसाचे मानद महासचिव सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष आशिष सिरसाट , अकोलावाला, सचिन म्हात्रे, निखिल सुळे, कोसिआचे खजिनदार, चेतन वैशंपायन, कीर्ती पंचाल, अशोक शाह, ललित चढा, कमल कपूर, मुकेश उत्तमनी, विनोद पंजाबी, गोपी खनवाणी, नरेंद्र धरमसी, परिका घोटीकर, प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या सितादीदी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून अप्पाना श्रद्धांजली वाहिली.
पोलीस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड म्हणाले की, माझा आणि अप्पांचा सहवास गेल्या दहा वर्षाचा म्हणजे मी सहायक आयुक्त असतांना पासूनचा आहे. जेव्हा जेव्हा अप्पासाहेब भेटायचे तेव्हा तेव्हा ते उद्योगांना भेडसावणारे प्रश्न मांडत असत. त्यांच्या जाण्याने उदयोन्मुख उद्योजकांचा मार्गदर्शक हरवला, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.
या शोकसभेत संपूर्ण भारतातून वेगवेगळ्या क्षेत्रातील सुमारे पाचशेहून अधिक मान्यवरांच्या लेखी व ध्वनी मुद्रित शोक संदेशांचे यावेळी वाचन करण्यात आले तसेच ऐकवण्यात आले. विशेषतः सध्या अमेरिकेत गेलेल्या संस्थेच्या अध्यक्षा सुजाता सोपारकर व वरिष्ठ पत्रकार रामकृष्णन यांनी पाठवलेल्या संदेशाचा समावेश आहे.
अप्पांचे चिरंजीव गिरीश खांबेटे, सून गीता खांबेटे, दोघे नातू ऍड.हर्षवर्धन, सीए नंदन, नात सून रेवती यांनी अभिवादन स्वीकारले. गीता खांबेटे ह्यांनी टिसा हे त्यांचे दुसरे घरच होते आणि त्यांचे कसे भावनिक, सामाजिक व औद्योगिक नाते संबंध निर्माण झाले होते ह्या बद्दल आदरपूर्वक भावना व्यक्त केल्या.
यावेळी खा. राजन विचारे , प्रदीप पेशकार सदस्य राष्ट्रीय लघुउद्योग बोर्डांचे सदस्य प्रदीप पेशकार यांच्यावतीने आलेल्या शोक संदेशाचे देखील वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन्स निनाद जयवंत व कार्यकारी सचिव एकनाथ सोनवणे यांनी केले.
===============================
- मागील इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप