आज आणि उद्या मुख्य मार्गावर 17 तर हार्बर मार्गावर 21 तासांचा ब्लॉक
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 19 नोव्हेंबर 2022 :
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि भायखळा स्थानका दरम्यानचा कर्नाक पूल पाडण्यासाठी मध्य रेल्वेच्या वतीने आज 19 आणि 20 नोव्हेंबरला, 27 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक मुख्य मार्गावर 17 तासांचा, हार्बर मार्गावर 21 तासांचा आणि मेल एक्सप्रेस कोचिंग डेपोच्या यार्ड लाईनवर 27 तासांचा असेल.
मेनलाईनवरील 17 तासांचा हा ब्लॉक सीएसएमटी ते भायखळा दरम्यान राहील. 17 तासांचा हा ब्लॉक 19 नोव्हेंबरला रात्री 11 वाजता सुरू होऊन , 20 तारखेला सायंकाळी 4 वाजता संपेल. तर हार्बर मार्गावर 21 तासांचा ब्लॉक सीएसएमटी ते वडाळा दरम्यान 19 नोव्हेंबरला रात्री 11 ते 20 तारखेला रात्री 8 वाजता संपेल. म्हणजेच, मेनलाईन आणि हार्बर मार्गावरील गाड्यांची संपुर्ण वाहतूक ब्लॉक सुरू झाल्यानंतर 17 आणि 21 तासानंतर सुरळीत होईल. मेल एक्सप्रेस यार्डलाईनची वाहतूक 27 तासानंतर म्हणजेच 21 नोव्हेंबरच्या पहाटे 2.00 वाजता सुरू होईल.
याबाबतची संपूर्ण माहिती ही सेंट्रल रेल्वेची ऑफिशियल वेबसाईट cr.indianrailways.gov.in वर तसेच सेंट्रल रेल्वेच्या सोशल मीडिया हँडल्सवर उपलब्ध आहे.
रेल्वे सेवांवर परिणाम
- ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.
- मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
- हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.
- रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.
मेल/एक्स्प्रेस गाड्यांचे रद्दीकरण
19.11.2022 रोजी रद्द ट्रेन
1) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
2) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
3) 12702 हैदराबाद – मुंबई हुसेन सागर एक्स्प्रेस
4) 12112 अमरावती – मुंबई एक्सप्रेस
5) 17058 सिकंदराबाद – मुंबई देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्ग
6) 17412 कोल्हापूर – मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस
7) 17611 नांदेड – मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस
8) 12187 जबलपूर – मुंबई गरीबरथ
20.11.2022 रोजी रद्द गाड्या
1) 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्सप्रेस
2) 12127 मुंबई – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
3) 11007 मुंबई – पुणे डेक्कन एक्सप्रेस
4) 12071 मुंबई – जालना जनशताब्दी एक्सप्रेस
5) 12188 मुंबई – जबलपूर गरीबर
6) 11009 मुंबई – पुणे सिंहगड एक्सप्रेस
7) 02101 मुंबई – मनमाड विशेष
8) 12125 मुंबई – पुणे प्रगती एक्सप्रेस पनवेल मार्गे
9) 11401 मुंबई – आदिलाबाद एक्सप्रेस
10) 12123 मुंबई – पुणे डेक्कन क्वीन
11) 12109 मुंबई – मनमाड पंचवटी एक्सप्रेस
12) 17612 मुंबई – नांदेड राज्यराणी एक्सप्रेस
13) 12111 मुंबई – अमरावती एक्सप्रेस
14) 17411 मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस
15) 11010 पुणे – मुंबई सिंहगड एक्स्प्रेस
16) 12124 पुणे – मुंबई डेक्कन क्वीन
17) 12110 मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस
18) 12126 पुणे – मुंबई प्रगती एक्स्प्रेस पनवेल मार्गे
19) 02102 मनमाड – मुंबई स्पेशल
20) 12072 जालना – मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस
21) 17057 मुंबई – सिकंदराबाद देवगिरी एक्सप्रेस, निजामाबाद मार्गे
22) 12701 मुंबई – हैदराबाद हुसेन सागर एक्सप्रेस
23) 11008 पुणे – मुंबई डेक्कन एक्सप्रेस
24) 12128 पुणे – मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस
25) 17618 नांदेड – मुंबई तपोवन एक्सप्रेस
पनवेल येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या ट्रेन्स:
1) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. 19.11.2022 रोजी सुटणारी ट्रेन.
2) 12134 मंगळुरु जं. – मुंबई एक्सप्रेस दि. 19.11.2022 रोजी सुटणारी ट्रेन.
३) 10112 मडगाव-मुंबई कोकण कन्या एक्सप्रेस दि. 19.11.2022 रोजी सुटणारी ट्रेन.
4) 10104 मडगाव – मुंबई मांडवी एक्सप्रेस दि. 20.11.2022 रोजी सुटणारी ट्रेन
———————————————————————-