राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ३१ ऑक्टोबर २०२२

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील तीन दिवस त्यांना मुंबईतील ब्रीज कॅन्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तीन दिवसांत त्यांच्यावर उपचार केल्यानंतर २ नोव्हेंबर रोजी त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे चिंतन शिबीर ४ नोव्हेंबरपासून शिर्डी येथे सुरू होणार आहे. या चिंतन शिबिराला शरद पवार उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे रुग्णालयातून सोडल्यानंतर  ३ नोव्हेंबर रोजी ते शिर्डी येथे दाखल होणार आहेत.

दरम्यान, सध्या शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅंडी रुग्णालयात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करण्यात येणार असून कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

=====================================