आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून विभागीय कामकाजाचा आढावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 3 ऑक्टोबर 2022:

नवी मुंबई महानगरपालिकेस देशात तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभला ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहेच. मात्र यापुढील काळात ते मानांकन उंचाविण्यासाठी आपली जबाबदारीही वाढली असल्याचे मत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी व्यक्त केले.

या आधीच्या काळात झालेल्या चांगल्या कामामुळे आपला बेंचमार्क सेट झाला असून आता त्यापुढे जाऊन प्रगती करण्यासाठी आपण प्रत्येकजण संपूर्ण क्षमतेने काम करेल असा विश्वासही व्यक्त केला.

महापालिका आयुक्त नार्वेकर यांनी महापालिका अधिकारी यांची विशेष बैठक घेत पहिल्याच बैठकीत विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. यापुढील काळात आयुक्त नार्वेकर प्रत्येक विभागाचा स्वतंत्रपणे सविस्तर आढावा घेणार असून विविध विभागांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देऊन कामकाजाची पाहणी करणार आहेत.

यावेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे यांनी अधिकारी वर्गाच्यावतीने महापालिका आयुक्तांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. नवी दिल्ली येथे पार पडलेल्या स्वच्छ अमृत महोत्सव कार्यक्रमात मिळालेल्या देशातील तृतीय क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे सन्मानचिन्ह, कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार रेटींग मानांकनाचे सन्मानचिन्ह तसेच इंडियन स्वच्छता लीगमध्ये युवक सहभागाचे देशातील प्रथम क्रमांकाचे प्रमाणपत्रांसमवेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व अधिकारी यांचे छायाचित्र काढण्यात आले.

————————————————————————————–