- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- पनवेल, १७ सप्टेंबर २०२२
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कामोठे युवा मोर्चाच्यावतीने शनिवारी कामोठे येथील भाजप व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश भाजपचे चौबे, कामोठे शहर मंडल अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, विकास घरत, गोपीनाथ भगत, भाऊ भगत, रवींद्र गोवारी, प्रदीप भगत, माजी नगरसेविका हेमलता गोवारी, कुसूम म्हात्रे, महिला मोर्चाच्या कामोठे अध्यक्षा वनिता पाटील, भटके विमुक्त आघाडीच्या जिल्हाध्यक्षा विद्या तामखडे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, कामोठे युवा मोर्चाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, उत्तर भारतीय सेलचे जिल्हा संयोजक जितेंद्र तिवारी, रुपाली सिन्हा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या काळात भारतीय जनता पक्षाच्यावतीने १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत ‘सेवात्मक’, ‘रचनात्मक’, ‘व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व’ अशा विविध सेवाकार्य असलेल्या ‘सेवा पंधरवडा’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज कामोठे येथे रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबिरात ७५ रक्तदात्यांनी रक्तदान करून शिबिराला चांगला प्रतिसाद दिला.