गणेशोत्सव कालवाधीतही नवी मुंबईतील कोव्हीड लसीकरण केंद्र सुरु राहणार

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 26 ऑगस्ट 2022 :

कोव्हीड लसीकरण अमृत महोत्सव 30 सप्टेंबर 2022 पर्यंत साजरा केला जात असून 31 ऑगस्ट पासून सुरु होणा-या श्रीगणेशोत्सव कालावधीतही नागरिकांना प्रिकॉशन डोस घेता यावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची सर्व रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणी सुविधा सुरु ठेवण्यात आलेली आहेत. कोव्हीड 19 लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांनी प्रिकॉशन डोस घेता येत आहे.

15 जुलैपासून केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात कोव्हीड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाला सुरुवात करण्यात आलेली असून या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात 25 ऑगस्ट 2022 पर्यंत 18 ते 59 वर्षे वयाच्या 66546 नागरिकांनी कोव्हीडचा तिसरा अर्थात प्रिकॉशन डोसचा लाभ घेतलेला आहे. 18 वर्षावरील नागरिकांना कोव्हीड लसीच्या पहिल्या व आणि दुस-या डोसचे 100 टक्के उद्दीष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने सर्वप्रथम पूर्ण केले. त्याच धर्तीवर तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस देण्याचीही कार्यवाही करण्यात येत आहे.

1 लाख 74 हजार 141 आरोग्यकर्मी, पहिल्या फळीतील कोरोना योध्दे तसेच 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे. याशिवाय 18 ते 59 वयोगटातील 66546 नागरिकांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे. प्रिकॉशन डोस घेऊन नागरिकांनी लस संरक्षित व्हावे याकरिता नागरी आरोग्य केंद्रांमार्फत स्थानिक परिसरात विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोव्हीडची लागण झाली तरी आजाराची तीव्रता मर्यादित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील आठवड्याभरापासून कोव्हीड बाधीतांच्या सख्येत काहीशी वाढ झालेली दिसत असून आगामी गणेशोत्सवाचा कालावधी लक्षात घेता जास्तीत जास्त नागरिकांनी लवकरात लवकर प्रिकॉशन डोस घेऊन लस संरक्षित व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

आत्तापर्यंत 13,85,585 नागरिकांनी कोव्हीडचा पहिला डोस घेतला असून 12,43,662 नागरिकांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे 1,74,141 नागरिकांनी प्रिकॉशन डोसचा लाभ घेतला आहे.

यामध्ये लहान मुलांच्या लसीकरणाकडेही विशेष लक्ष दिलेले असून 15 ते 18 वयोगटातील पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दीष्ट नवी मुंबई महानगरपालिकेनेच पहिल्यांदा पूर्ण केलेले आहे. आत्तापर्यंत 82,289 मुलांना पहिला डोस दिलेला असून 67,117 मुलांना दोन्ही डोस देण्यात आलेले आहेत. दुस-या डोसचे 100 टक्के उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी शाळा व महाविद्यालयीन पातळीवर विशेष प्रयत्न केले जात आहेत.

  • 12 ते 14 वयोगटातील पहिल्या डोसचे 99 टक्के उद्दीष्ट पूर्ण
  • 12 ते 14 वयोगटातील 46,923 मुलांना पहिला डोस देण्यात आलेला असून याचेही 99 टक्के उद्दीष्ट पूर्ण झालेले आहे. यामधील 36,724 मुलांनी दोन्ही डोस घेतलेले आहेत. पहिल्या डोसचे 100 टक्के उद्दीष्ट येत्या काही दिवसातच पूर्ण करण्याचे नियोजन नजरेसमोर ठेवून कार्यवाही सुरु आहे.

 

कोर्बिव्हॅक्स ही लस प्रिकॉशन डोस

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोर्बिव्हॅक्स ही लस प्रिकॉशन डोस म्हणून घेता येईल. कोर्बिव्हॅक्स या लसीला विषम कोव्हीड 19 बुस्टर लस म्हणून मन्यता मिळाली असून ज्या 18 वर्षावरील नागरिकांनी यापूर्वी कोव्हीशिल्ड अथवा कोव्हॅक्सीन लसीचे दोन डोस घेतले असतील ते नागरिक 6 महिने किवा 26 आठवडयानंतर कोर्बिव्हॅक्स लस प्रिकॉशन डोस म्हणून घेऊ शकतात.

—————————————————————————————————————-