- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 19 ऑगस्ट 2022
समस्त दिवाळे ग्रामस्थ मंडळ आणि समस्त दिवाळे ग्रामस्थ यांच्यावतीने जन्माष्टमीच्या निमित्ताने दिवाळे कोळीवाडा इथल्या मारुती मंदीरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 12 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या दरम्यान झालेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाच्या उत्सवात विविध कार्यक्रम घेण्यात आले. हरिनाम सप्ताहात जन्माष्टमीच्या दिवशी गुरूवारी 18 ऑगस्ट रोजी पारंपरिक पध्दतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
श्रीकृष्ण जन्माच्या या उत्सवात मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावून भक्ती भावाने कान्हाच्या जन्माचा उत्सव सुरांची उधळत करीत साजरा केला.
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त कीर्तन चंद्रिका ह.भ.प. रोहिणीताई माने- परांजपे आणि नारदीय किर्तनकार ह.भ.प. कौस्तुभ महाराज परांजपे यांच्या विशेष किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भक्तीरसाने ओथंबून वाहणाऱ्या सुरांच्या धारांनी दिवाळे ग्रामस्थ न्हाऊन निघाले.
दिवाळे ग्रामस्थांच्यावतीने आयोजित केलेल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला परशुराम पाटील, एकनाथ नाईक, मोरेश्वर मार्के, अशोक गझने, ज्ञानेस्वर घरत, चंद्रकांत बाये, भाग्यवान कोळी,भारत कोळी, वासुदेव कोळी, बळीराम कोळी, शंकर घरत, सुरेश कोळी, हरिश्चंद्र कोळी, एकनाथ कोळी, सुरेश नाईक, बाबू कोळी,दत्तात्रय कोळी,चंदू कोळी, भूषण कोळी, अनंता बोस, सुभाष कोळी, सोमनाथ देवकर, संतोष कोळी, निलकंठ कोळी तसेच मोठ्या संख्येने बाळगोपाळ, महिलांनी हजेरी लावली.
दरम्यान,आठवडाभर सुरू असलेल्या या हरिनाम सप्ताहाच्या यशश्वीततेसाठी दिवाळे गावातील तरुण मंडळींनी दिवसरात्र मेहतन घेतली. या तरुण मंडळींमुळेच एवढा मोठा सोहळा आनंदाने पार पडल्याचे सांगत गावातील ज्येष्ठांनी या तरुणांचे मनापासून आभार मानले.
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप