- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई,4ऑगस्ट 2022
महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची संघटनात्मक पुर्नबांधणी करण्यात येत असून गेल्या काही महिन्यांपासून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहे. काँग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सरचिटणिसपदी तर महानंद रामराजेंची जुईनगर प्रभाग 31 (अ)च्या प्रभारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक यांनी सोनवणे व रामराजें यांना नियुक्तीपत्र दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या नेरूळ सेक्टर 2 येथील नेरूळ ब्लॉक काँग्रेसच्या कार्यालयात कामगार नेते व नेरूळ ब्लॉक अध्यक्ष रविंद्र सावंत यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरीत करण्यात आले.
नियुक्तीपत्र देताना कामगार नेते रविंद्र सावंत यांनी आपल्या विभागात आपल्या कामाच्या माध्यमातून पक्ष जनताभिमुख करण्याचा व पक्षाचा जनाधार वाढविणेचे आवाहन केले. यावेळी काँग्रेसच्या जिल्हा सचिव विद्या भांडेकर, प्रल्हाद गायकवाड यांच्यासह यावेळी शिवाजी माने, राजेंद्र चौरसिया, आबा शिंदे. बाळकृष्ण धडेल, अण्णा नलावडे, पंडीत जावळे, चंद्रशेखर तोडकरी, सुनील पगारे, सुनील बेले, हनुमंत सरोदे, बाबुराव कोचरेकर, दादा दगडू नलावडे, बाजीराव सोंडे, बाळु जाधव, कैलास म्हात्रे, रविंद्र इंगळे, भोसले सर, वामन रंगारी उपस्थित होते.