- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 15 जुलै 2022
गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून पश्चिम रेल्वेच्या सहाय्याने कोकण रेल्वे मार्गावर आणखी जादा गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांनी या अतिरिक्त गाड्यांचाही लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
- गाडी क्रमांक 09001 मुंबई सेंट्रल- ठोकूर (साप्ताहिक) ही गाडी 23,30 ऑगस्ट, 6 सप्टेंबर या दिवशी दुपारी 12 वाजता मुंबई सेंट्रलवरून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 30 ला ठोकूर स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09002 ठोकूर –मुंबई सेंट्रल (साप्ताहिक) ही गाडी 24,31 ऑगस्ट, 7 सप्टेंबर या दिवशी सकाळी 45 ला ठोकूर स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.5 ला मुंबई सेंट्रल स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गणपती विशेष गाड्यांना बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड ,थिविम, करमाळी, मडगाव जं., कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भतकळ, मुकांबिका रोड, बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्कि आणि सुरतकल स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 24 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 टायर 1, 3 टायर 5, स्लीपर 12, सिटींग 4 डबे असणार आहेत.
- गाडी क्रमांक 09003 मुंबई –सेंट्रल मडगाव ( आठवड्यातून 6 दिवस) विशेष गाडी 24 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या काळात मंगळवार वगळून सर्व दिवशी दुपारी 12 वाजता मुंबई सेंट्रल येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 30 वाजता मडगावला पोहेचेल.
- गाडी क्रमांक 09004 मडगाव- मुंबई –सेंट्रल ( आठवड्यातून 6 दिवस) विशेष गाडी 25 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर या काळात बुधवार वगळून सर्व दिवशी सकाळी 15 वाजता मडगावहून सुटून दुसऱ्या दिवशी दिवशी पहाटे 1 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहेचेल.
- गाडीचे थांबे
या गणपती विशेष गाड्यांना बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड ,थिविम, करमाळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 24 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 टायर 1, 3 टायर 5, स्लीपर 12, सिटींग 4 डबे असणार आहेत.
- गाडी क्रमांक 09001 वांद्रे –कुडाळ ही विशेष गाडी 25 ऑगस्ट , 1 आणि 8 सप्टेंबर या दिवशी दुपारी 40 वाजता वांद्रे येथून सुटेल आ दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४० ला कुडाळ स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09002 कुडाळ- वांद्रे ही विशेष गाडी 26 ऑगस्ट , 2 आणि 9 सप्टेंबर या दिवशी सकाळी 45 वाजता वांद्रे येथून सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 9.30 ला वांद्रे स्थानकात पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गणपती विशेष गाड्यांना बोरिवली, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 22 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये सिटींग 20 आणि 2 जनरेटरचे डबे असणार आहेत.
- गाडी क्रमांक 09018 उधना जं.- मडगाव ही विशेष गाडी 26 ऑगस्ट, 2 आणि 9 सप्टेंबर या दिवशी दुपारी 25 ला उधना येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता मडगावला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09019 मडगाव- उधना जं. ही विशेष गाडी 27 ऑगस्ट, 3 आणि 10 सप्टेंबर या दिवशी सकाळी 5 ला मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता उधनाला पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गणपती विशेष गाड्यांना नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 24 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 टायर 1, 3 टायर 5, स्लीपर 12, सिटींग 4 डबे असणार आहेत.
- गाडी क्रमांक 09412 अडमदाबाद- कुडाळ (साप्ताहिक) ही विशेष गाडी 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी सकाळी 30 ला अहमदाबाद येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5.40 ला कुडाळला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09411 कुडाळ- अडमदाबाद (साप्ताहिक) ही विशेष गाडी 31 ऑगस्ट आणि 7 सप्टेंबर या दिवशी सकाळी 45 ला कुडाळहून येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 ला अहमदाबादला पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गणपती विशेष गाड्यांना वडोदरा, सुरत, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 24 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 टायर 1, 3 टायर 5, स्लीपर 12, सिटींग 4 डबे असणार आहेत.
- गाडी क्रमांक 09150 विश्वमित्री- कुडाळ ही साप्ताहिक २९ ऑगस्ट आणि ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी १० वाजता विश्वमित्रीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४० ला कुडाळला पोहोचेल.
- गाडी क्रमांक 09149 कुडाळ – विश्वमित्री ही साप्ताहिक 30 ऑगस्ट आणि 6 सप्टेंबर या दिवशी सकाळी 45 ला कुडाळहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 1 वाजता वाजता विश्वमित्रीला पोहोचेल.
- गाडीचे थांबे
या गणपती विशेष गाड्यांना भरुच, सुरत वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडीवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
- डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना 24 डबे जोडण्यात येणार आहेत. त्यामध्ये 2 टायर 1, 3 टायर 5, स्लीपर 12, सिटींग 4 डबे असणार आहेत.
१८ जुलैपासून या विशेष गाड्यांचे तिकीट आरक्षण सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठीwww.enquiry.indianrail.gov.in किवा NTES App डाउनलोड करा.
========================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप