- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 14 जुलै 2022
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर आणि मडगाव दरम्यान २० अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे.
गाड्यांचा तपशील पुढीलप्रमाणे
- 01139 विशेष ही गाडी 27 जुलै ते 28 सप्टेंबर या काळात प्रत्येक बुधवार आणि शनिवारी नागपूर येथून दुपारी ३.५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल.
- 01140 विशेष ही गाडी २८ जुलै ते २९ सप्टेंबर या काळात दर गुरुवार आणि रविवारी मडगाव येथून सायंकाळी 7 वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी रात्री 9.30 वाजता पोहोचेल.
गाड्यांचे थांबे
वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
डब्यांची रचना
एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, 11 शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह 6 सामान्य द्वितीय श्रेणी.
गाडयांचे तिकीट आरक्षण
विशेष ट्रेन क्र. 01139/01140 साठीचे बुकिंग विशेष शुल्कासह 16 जुलैपासून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तसेच तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.