कोविडची मोफत बूस्टर मात्रा  : महाराष्ट्रात संपूर्ण अंमलबजावणी करणार

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांना दिली ग्वाही
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 14  जुलै 2022

शुक्रवारपासून पुढील ७५ दिवस देशातील सर्व प्रौढ व्यक्तींना कोविडचा बूस्टर डोस(वर्धक मात्रा) मोफत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून या मोहिमेची पुरेपूर अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दिली.

या देशव्यापी मोहिमेसंदर्भात आपली पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी दिली.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी आरोग्य विभागास निर्देश दिले की, या मोहिमेमध्ये एकही दिवस वाया घालू न देता सर्व संबंधितांना बूस्टर मात्रा मिळालीच पाहिजे यासाठी राज्यातील सर्व लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, आरोग्य संस्था यांना देखील सहभागी करून घ्यावे. याविषयी पुरेशी जन जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले.

========================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप