- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- ठाणे, 13 जुलै 2022
जुलै महिन्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे भातसा नदीला पूर आला असून पुराच्या पाण्यासोबत जॅकवेलमध्ये मोठ्या प्रमाणावर गाळ व कचरा जमा झालेला आहे. पाण्यासोबत आलेला गाळ व कचरा पिसे येथील पंपाच्या स्ट्रेनरमध्ये अडकल्याने सदरच्या पंपाचा फ्लो कमी झाला आहे. परिणामी ठाणे शहरात होणारा पाणीपुरवठा मागील तीन ते चार दिवसांपासून कमी प्रमाणात होत असून पाऊस व पुराचे पाणी कमी होईपर्यंत पुढील तीन ते चार दिवस पाणीपुरवठा कमी प्रमाणात होणार आहे.
तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप