कोपरखैरणेतील वाहतूक समस्येविरोधात मनसे आक्रमक

नवी मुंबई मनसे नेते प्रसाद घोरपडे यांचे वाहतूक विभागाला पत्र

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13  जुलै 2022

शाळा आणि खासगी कंपन्यांच्या बसेसमुळे कोपरखैरणे परिसरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले असून मुलांची ने आण करणाऱ्या स्कूल बसेसचे तसेच वाहतूक व्यवस्थेचे योग्य नियोजन करावे,अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांनी नवी मुंबई वाहतूक शाखेकडे केले आहे.

कोपरखैरणे मध्ये होणाऱ्या वाहतुक समस्या बाबत महाराष्ट्र निर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना व महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना यांच्या संलग्न बैठकीत नवी मुंबई वाहतूक पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांना पत्र देण्यात आले. या पत्रात  शाळा व त्यांच्या खाजगी बसेस तसेच विद्यार्थ्यांना घ्यायला येणाऱ्या पालकांच्या खाजगी गाड्या यांच्यामुळे स्थानिक नागरिकांना वारंवार वाहतूक कोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे,  तरी सदर अडचणीवर एक ठोस उपाययोजना व कारवाई व्हावी अशी विनंती वाहतूक शाखेचे उपायुक्तांना करण्यात आल्याची माहिती प्रसाद घोरपडे यांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष प्रसाद घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये शहर सहसचिव शरद दिघे, विद्यार्थी सेना उपाध्यक्ष श्रेयस शिंदे, विद्यार्थी सेना शहर सचिव शुभम इंगोले, वाहतूक सहसंघटक प्रवीण गाडेकर, शाखाध्यक्ष अजिंक्य ठोकळ आदींच्या शिष्टमंडळाने वाहतूक शाखेच्या उपायुक्तांची भेट घेतली.


=====================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप