तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर

प्रातिनिधिक छायाचित्र

परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 12  जुलै 2022

ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या तसेच तानसा व वैतरणा नदीच्या परिसराच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागर ही धरणे आहेत. तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची पाताळी ही 128.63 मिटर व 163.14 टीएचडी इतकी आहे. आज तानसा व मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी ही 125.33 मीटर व 161.33 मीटर इतकी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही पातळी पुढील काही दिवसात ओलांडून ही दोन्ही धरणे ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही धरणाखालील तसेच तानसा व वैतरणा नदीलगतच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांना व तेथील ग्रामस्थांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

========================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप