एप्रिल-मे महिन्यात ७८,५७७ पेक्षा जास्त प्रवाशांचा प्रवास
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, ९ जून २०२२
माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत ७८,५७७ प्रवाशांनी प्रवास केला आणि ९,११५ पॅकेजेसची वाहतूक केली, तर अमन लॉज आणि माथेरान दरम्यान एप्रिल ते मे २०२१ या कालावधीत ५,७३९ प्रवाशांची आणि २,९३१ पॅकेजेसची वाहतूक केली गेली.
हे ठिकाण केवळ प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नव्हे तर निसर्गाच्या जवळ जाणारे ठिकाण म्हणूनही लोकप्रिय आहे. हा प्रवास टॉय ट्रेनमधील अविस्मरणीय राईडसह निसर्ग जवळून पाहण्याचा थरार पर्यटकांना देतो.
पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच, या सेवा स्वस्त आणि जलद साहित्याची वाहतूक करण्यासही मदत करतात. यामुळे एप्रिल ते मे २०२२ या कालावधीत ५४.५९ रुपये लाखांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये ५३.८ रुपये लाख प्रवासी महसूल आणि ७४,११७ रुपयांच्या पार्सल महसुलाचा समावेश आहे. त्या तुलनेत एप्रिल – मे २०२१ या कालावधीतील २.९४ रुपये लाख महसुलात २.७० रुपये लाख प्रवासी महसूल तर पार्सलमधून २४,४७५ रुपये महसूल प्राप्त झाला होता.
==================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप