रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी 25 मे पर्यंत बंद राहणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 25 एप्रिल 2022:
मुंबई- गोवा महामार्गावरील (mumbai -goa highway) चिपळूण तालुका आणि खेड तालुक्याला जोडणारा परशुराम घाट (parshuram ghat) आजपासून 25 मे पर्यंत महिनाभरासाठी बंद राहणार आहे. रस्ता रूंदीकरणाच्या कामासाठी हा घाट सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत बंद राहणार असला तरी या कालावधीत पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. या पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या काळात चारचाकी वाहने आणि दुचाकींसाठी आंबडस- चिरणी- लोटे रस्ता आणि आंबड- धामणंद रस्ता या मार्गाचा वापर करता येणार आहे तर अवजड वाहने मुंबई- पुणे- कराड या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामाध्ये या घाटाचे काम पावसाळ्याअगोदर पूर्ण करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात या घाटात दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे रस्ता धोकादायक बनला आहे. त्यामुळे घाटाखाली असणा-या लोकवस्तीचा आणि घाटातून होणा-या रहदारीच्या सुरक्षेचा विचार करून घाटातील वाहतूक महिनाभरासाठी बंद राहणार आहे.
——————————————————————————————————