25, 26 फेब्रुवारी  रोजी  द्रोणागिरी, उलवे, खारघर नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांचा पाणी पुरवठा बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 22 फेब्रुवारी 2022

सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा योजने अंतर्गत असलेल्या वाहिनीवर महावितरणकडून होणाऱ्या विजेचा पुरवठा त्यांच्या जिते येथील उपकेंद्राच्या दुरुस्ती व देखभालीच्या कामांमुळे बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सिडकोचे हेटवणे जल शुद्धीकरण केंद्र बंद राहणार आहे. याचा परिणाम द्रोणागिरी, उलवे, खारघर नोडसह हेटवणे जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या गावांचा पाणी पुरवठा  25 फेब्रुवारी रोजी  सकाळी 10 वाजेपासून ते 26 फेब्रुवारी सकाळी 10वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

तरी संबंधित नोड आणि गावांतील नागरिकांनी पाणी साठवण्याची योग्य ती व्यवस्था करावी व सदर कालावधी दरम्यान पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप