दक्षिण पूर्व आशियातील पहिली फिरती प्रयोगशाळा
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नाशिक, 18 फेब्रुवारी 2022:
सूक्ष्म किंवा अतिसूक्ष्म विषाणूपासून होणारे कोविड सारखे इतरही संभाव्य प्राणघातक आजार टाळण्यासाठी प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन (PM – ABHIM ) च्या अंतर्गत जैवसुरक्षा श्रेणी-3 (BSL-3) ही पहिली फिरती प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. दक्षिण पूर्व आशियातील या पहिल्या बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरत्या प्रयोगशाळेचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आज नाशिक इथे लोकार्पण करण्यात आले. या फिरत्या प्रयोगशाळेसाठी जवळपास 25 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आय सी एम आर-राष्ट्रीय विषाणू संस्था आणि क्लेंज़ाईड्स कंपनी यांनी एकत्रितपणे काम करत अत्यंत अत्याधुनिक अशी बायोसेफ्टी श्रेणी 3 फिरती प्रयोगशाळा, संपूर्ण भारतीय साहित्य वापरून केल्याबद्दल त्यांनी सर्व शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांचे कौतुक केले.
- सर्वाधिक घातक अशा संसर्गजन्य विषाणूचा शोध /तपास करण्यास सक्षम असलेली ही प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेसाठी वापरण्यात आलेले 95 टक्के साहित्य भारतात बनलेले आहे. अत्याधुनिक अशा या प्रयोगशाळेतील रियल टाइम डेटा हा आय सी एम आर ला थेट उपलब्ध होईल हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे.
प्रधानमंत्री आयुष्मान भारत आरोग्य पायाभूत सुविधा अभियानाचा (PM-ABHIM) भाग म्हणून आरोग्य संशोधन संचालनालय आणि भारतीय वैद्यकीय परिषद (ICMR) यांनी एक स्वदेशी बनावटीची बायोसेफ्टी श्रेणी-3 ची प्रतिबंधक क्षेत्रासाठी खास बनवून घेतली आहे. या प्रयोगशाळेच्या मदतीने, नव्याने येणाऱ्या, आणि पुनःपुन्हा येणाऱ्या विषाणूजन्य संसर्गाचा शोध घेता येईल.
बायोसेफ्टी श्रेणी-3 फिरत्या प्रयोगशाळेविषयी आयसीएमआर आणि क्लेंज़ाईड्स कंपनीने एकत्र येत, भारतातील पहिली फिरती बीएसएल-3 अद्ययावत प्रयोगशाळा- बायोक्लेंज़® ची रचना करत ती विकसित केली आहे.
प्रयोगशाळेचे वैशिष्ट्य
बायोक्लेंज़® ची निर्मिती क्लेंज़ाईड्सने त्यांच्या सर्वोत्तम सुविधांचा वापर करत केली आहे. भारत बेञ्ज बस चेसिस (सांगाडा) वर ही प्रयोगशाळा बांधण्यात आली असून ती कुठेही- अगदी दुर्गम भागात देखील सहजपणे, कुठल्याही इतर साधनांची मदत न घेता, एखाद्या बसप्रमाणे घेऊन जाता येते .फिरत्या बीएसएल- 3 प्रयोगशाळेची वैशिष्ठ्ये बायोक्लेंज़®बीएसएल- 3 ही एक अत्याधुनिक आणि सुसज्ज, स्वयंपूर्ण अशी प्रयोगशाळा असून या संशोधनासाठी आवश्यक अशी सर्व व्यवस्था आणि उपकरणे या प्रयोगशाळेत आहेत. त्यामुळे जिथे परीक्षण करायचे असेल, तिथे इतर कुठल्याही अतिरिक्त उपकरणांची गरज भासणार नाही.
ही प्रयोगशाळा हवाबंद असून, तिथे प्रवेश नियंत्रित आणि जैव-संसर्ग प्रतिबंधक असेल. या प्रयोगशाळेत एचईपीए फिल्टरेशन आणि जैविक द्रवरुप कचरा संसर्ग प्रतिबंधक व्यवस्था देखील आहे, यामुळेच, या प्रयोगशाळेला बीएसएल-3 अत्याधुनिक असा दर्जा मिळाला आहे.अतिशय आधुनिक अशा स्वयंचलित नियंत्रण व्यवस्थेद्वारे तिचे नियंत्रण केले जाऊ शकेल,ज्यामुळे, संशोधनाच्या जागी हवेचा निगेटिव्ह दाब कायम ठेवला जाईल. तसेच उपकरणांच्या गुणवत्तेचे निकष आणि आवश्यक त्या महितीचे व्यवस्थापन देखील केले जाईल..
महामारीच्या उद्रेकाचा शोध घेता येणे शक्य होणार
या प्रयोगशाळेमुळे देशाच्या दुर्गम आणि सुदूर भागात जाता येईल जिथे आयसीएमआरचे – एनआयव्ही, आरएमआरसी – गोरखपूर या सारखे आयसीएमआरचे विशेष प्रशिक्षित वैज्ञानिक मनुष्य आणि प्राण्यांच्या नमुन्यांची चाचणी करून महामारीच्या उद्रेकाचा शोध घेऊ शकतील. या प्रतिबंधित क्षेत्रासाठीच्या फिरत्या प्रयोगशाळेत नमुन्यांवर जलदगतीने प्रक्रिया करून सुरक्षितपणे चाचणी केली जाऊ शकेल. या कामांमुळे अशा आजारांचा उद्रेक झाल्यास त्यावर त्या जागी आणि योग्य वेळेत निदान करुन उपाययोजना सुरु करता येतील.
——————————————————————————————————