राज्याचा अर्थ संकल्प 11 मार्चला सादर होणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 15 फेब्रुवारी 2022:
महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. असा निर्णय विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या दरम्यान सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे.
विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (ऑनलाईन उपस्थित) उपमुख्यमंत्री अजित पवार, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या सुरुवातीला कोविडच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करुन सर्वांनी आरटीपीसीआर चाचणी करणे बंधकारक आहे तसेच कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
——————————————————————————————————