दहावी व बारावीच्या परीक्षार्थींसाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईन सुविधा उपलब्ध

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 11 फेब्रुवारी 2022

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 मध्ये आयोजित उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12 वी) व माध्यमिक परीक्षा (10 वी) च्या परीक्षासंदर्भात विद्यार्थी, पालकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळातर्फे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे विभागीय सचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली आहे.

विभागीय मंडळाने दूरध्वनी क्रमांक (022)27893756. (022)27889075 हे दोन हेल्पलाईन क्रमांक सुरू केले आहेत. सुविधा दि. 04 फेब्रुवारीपासून कार्यांन्वित करण्यात आली असून या नियंत्रण कक्षाचे कामकाज सकाळी 9.00 ते रात्री 7.00 या वेळेत सुरु राहणार आहे.

मुंबई विभागीय मंडळाने यासंदर्भात प्रसिद्ध पत्रक दिले आहे. इयत्ता बारावीची अंतर्गत लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत होणार आहे. कोविड-19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आयोजित उपरोक्त परीक्षेचे निश्चित केलेले स्वरूप व मंडळामार्फत केलेले विशेष उपाययोजना या संदर्भात विद्यार्थी, पालक व संबंधित घटक यांना येणाऱ्या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी व आवश्यक मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई विभागीय मंडळात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षामार्फत तसेच मंडळामार्फत नियुक्त समुपदेशक / शिक्षक समुपदेशक यांच्या मार्फत विद्यार्थ्यांचे परीक्षेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने समुपदेशन करण्यासाठी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

 कार्यालयातील हेल्पलाईनसाठी नियुक्त अधिकारी/कर्मचारी यांचे नाव, पद व भ्रमणध्वनी क्रमांक पुढील प्रमाणे –

संगीता रोकडे, अधिक्षक तथा सहसचिव (प्र.) (भ्र.क्र. 8928892225),  सुकन्या सावंत, वरिष्ठ अधिक्षक तथा सहा.सचिव (प्र.) (भ्र.क्र.9820217816), संजय कापसे, वरिष्ठ अधिक्षक (भ्र.क्र.9921390613), . नयन म्हात्रे सहा.अधिक्षक (भ्र.क्र. 9819806109).

समुपदेशकांची नाव, अंतर्गत/बहिर्गत व दूरध्वनी/भ्रमणध्वनी क्रमांक

श्रीकांत शिवगारे (दू.क्र. 022- 27893756, कल्पेश मनोहर शिंदे, (022-27881075), हयाळीज बी.के., (भ्र.क्र.9423947266),  अनिलकुमार दि. गाढे, (भ्र.क्र.9969038020), जाधव विकास नारायण (भ्र.क्र.9867874623), अल्मडा रोबर्ट, (भ्र.क्र.8850409911/9226761820), विनोद पन्हाळकर ( भ्र.क्र.9527587789), संजय जाधव (भ्र.क्र.9422594844), चंद्रकांत ज. मुंढे (भ्र.क्र.8169699204), अशोक देवराम सरोदे (भ्र.क्र.9322527076/8888830139), शैलजा मुळये (भ्र.क्र.9820646115), शेख अखलाक अहमद अ. रज्जाक (भ्र.क्र.9967329370), स्नेहा अजित चव्हाण (भ्र.क्र.8369015013).

===============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप