कंटेंट ऑन डिमांड – मध्य रेल्वे आणि शुगरबॉक्स नेटवर्कद्वारे सेवा पुरविणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 11 फेब्रुवारी 2022
मध्य रेल्वे आणि मेसर्स मार्गो नेटवर्क प्रा. लि. ने उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवाशांना मोफत इन्फोटेनमेंट सेवा प्रदान करण्यासाठी हातमिळवणी केली आहे. मध्य रेल्वेच्या नॉन-फेअर उत्पन्नाचा एक भाग म्हणून, मेसर्स मार्गो नेटवर्क प्रा. लि. आपल्या शुगर बॉक्स ॲपद्वारे उपनगरीय ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रवाशांना ही सुविधा प्रदान करणार आहे. नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांना चांगला अनुभव देण्याचा भविष्यकालीन दृष्टीकोन पहिल्या टप्प्यात 10 उपनगरीय रेकमधील प्रवाशांसाठी डिजिटल सुविधा 11 फेब्रुवारी रोजीपासून सुरू करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, एप्रिल ते जानेवारी 2021-22 या कालावधीसाठी मध्य रेल्वेचा नॉन-फेअर महसूल 22.57 कोटी आहे, जो गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 295% अधिक आहे आणि सर्व क्षेत्रीय रेल्वेंमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. 165 उपनगरीय EMU रेकमध्ये “कंटेंट ऑन डिमांड” साठीच्या करारातून पाच वर्षांच्या कार्यकाळात रेल्वेला रू. 8.17 कोटी मिळणार आहेत.
लाहोटी म्हणाले की, मुंबई विभाग, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता या कंटेंट ऑन डिमांड सेवेद्वारे इन्फोटेनमेंटचा अनुभव घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना परवानाधारकाचे शुगर बॉक्स ॲप डाउनलोड करावे लागेल. कंटेंट मध्ये प्रवेश (access) करण्यासाठी, इंटरनेटची आवश्यकता नाही. डेटाच्या वापरासाठी प्रवाशांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.
मोबाईल नेटवर्क अनियमित किंवा अनुपलब्ध असताना देखील प्रवासी आता त्यांच्या संपूर्ण रेल्वे प्रवासात डिजिटल सेवांचा अखंडपणे आनंद घेऊ शकतात आणि माहिती, करमणूक, खरेदी, शिक्षण आणि अपस्किलिंग सेवा, पेमेंट प्लॅटफॉर्म आणि बरेच काही मिळवू शकतात, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले.
===============================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप