महाराष्ट्राचा ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराने सन्मान

‘गुणवत्ता सुधार’ वर्गवारीत महावितरणचा तृतीय क्रमांक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, ११ जानेवारी २०२२

नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता आधुनिक  तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून  वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करणे या निकषांवर महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम क्रमांकाने तर ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Other Video On YouTube

१५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांनमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. आज ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक(प्रकल्प) भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने नुकतेच दोन दिवस या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची  निवड केली. राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण ही अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरव उद्गार अनिल राजदान यांनी काढले.

Other Video On YouTube

ग्राहकसेवेचे हे व्रत असेच जोपासत त्यात गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला.

=====================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप