ऑनलाइन पध्दतीने शिक्षण सुरू राहणार
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क नवी मुंबई, 3 जानेवारी 2022:
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या कोरोना रूग्णसंख्येचा विचार करता मुंबई, ठाणे , नवी मुंबई परिसरात पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असणा-या सर्व माध्यमांच्या शाळा 4 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी ऑनलाइन पध्दतीने शिक्षण सुरू राहणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ठाणे जिल्ह्यातील शाळांविषयी दिलेली माहिती
मुंबई महापालिका क्षेत्रात ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार वाढत असल्याने तसेच या शहरात जगभरातून लोकांचे जाणे- येणे असल्याने संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आजपासून 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले असल्याने लसीकरणाच्या नियोजनानुसार विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहून लसीकरण करून घ्यावे लागणार आहे.
याआधी 15 डिसेंबर पासून पहिली ते सातवीच्या शाळा ऑफलाइन पध्दतीने सुरू कण्यात आल्या होत्या. आता मात्र या शाळा 31 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्यात येेणार आहेत.