नाशिकमध्ये 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सुरूवात

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नाशिक, 3 डिसेंबर 2021:

कुसुमाग्रज नगरीत रंगणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाची सुरूवात भव्य ग्रंथदिंडीने करण्यात आली. टिळकवाडी इथल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या कार्यालयातून ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा पालकमंत्री छगन भुजबळ, उपाध्यक्ष तथा कृषीमंत्री दादाजी भुसे व मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते दिंडींचे पूजन करण्यात आले.

साहित्य संमेलनाचा शुभारंभ करणाऱ्या या ग्रंथदिंडीच्या सोहळ्यासाठी लेखक, कवी, साहित्यिक, विद्यार्थ्यांचे लेझीम पथक व साहित्यप्रेमींनी उपस्थिती लावली होती. पारंपरिक वेशभूषा परिधान करून शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले, लेझीम पथक, वारकरी मंडळी व ढोलताशांच्या गजरात ग्रंथ दिंडीला सुरूवात करण्यात आली. ग्रंथदिंडीच्या पालखीमध्ये भगवत गीता, ज्ञानेश्वरी व कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा ठेवण्यात आली होती. संमेलनात ग्रंथ प्रदर्शनाचे दीडशे स्टॉल लावण्यात आले आहेत.

——————————————————————————————————