स्वच्छ सर्वेक्षणातील यशाबद्दल भाजपतर्फे सफाई कामगारांचा सत्कार

नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांचा पुढाकार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 नोव्हेंबर 2021

नवी मुंबई महानगर पालिकेला स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये १० ते ४० लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांक तसेच सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज अभियानात देशांतर्गत द्वितीय क्रमांक व कचरामुक्त शहराचे फाईव्ह स्टार तसेच वॅाटरप्लस मानांकन’ मिळाल्याच्या अनुषंगाने नवी मंबई भाजपच्यावतीने तुर्भे परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली या वेळी सर्व कर्मचाऱ्यांना शाल व मिठाई देऊन सन्मान करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संकेत डोके, समाजसेवक सुरेश शेट्टी, कमलेश भानुशाली, संतोष म्हात्रे, संतु रॅाय, अमित चौथमोल व सफाई कर्मचारी सुपरवायझर अशोक तुकाराम पोष्टुरे, कृष्णा पाटील उपस्थित होते.

यावेळी  जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांनी सफाई कामगारांचे आभार मानले व सफाई कामगारांच्या योगादानामुळेच नवी मुंबई महानगरपालिकेला हा सन्मान मिळाला असल्याचे प्रतिपादन केले. तर आपल्या महापालिकेला मिळालेला हा सन्मान म्हणजे सर्व सफाईकामगार व तत्सम यंत्रणेचा सन्मान आहे व महापालिकेला मिळालेला हा सन्मान टिकवण्यासाठी आनखी जोमाने काम केले पाहिजे असे मत संकेत डोके यांनी व्यक्त केले.यावेळी सुरेश शेट्टी यांनी सफाई कर्मचार्यांनी कोरोनाकाळातही आपल्या जीवाची पर्वा न करता उत्तम कार्य केल्याची भावना व्यक्त केली.

==========================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप