नवी मुंबईला बेस्ट परफॉर्मिंग सिटी पुरस्कार

महापालिकेला केंद्राचे सहा कोटींचे पारितोषिक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 नोव्हेंबर 2021

नवी मुंबई महापालिकेला सफाई मित्र अभियानंतर्गत राष्ट्रीय पातळीवरील देशातील दुसऱ्या क्रमांकाचा बेस्ट फरफॉर्मिंग सिटी पुरस्कार घोषित झाला आहे. नवी मुंबई महापालिकेने स्वच्छता मित्रांसाठी राबविलेल्या कामाची दखल म्हणून 6 कोटी रूपयांचा हा पुरस्कार देण्यात आला आहे.

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत नवी मुंबई महापालिकेची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. विविध नाविण्यपूर्ण उपक्रम राबवित तसेच शहरातील नागरिकांनाही सामावून घेत नवी मुंबई महापालिकेने स्वच्छतेबाबत चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे याआधीही महापालिकेला विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे.

==============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप