विधान परिषदेच्या 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान

  • अविरत वाटचाल न्यूज
  • मुंबई, 10 नोव्हेंबर 2021:

 महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून रिक्त होणाऱ्या 6 जागांसाठी  भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 10 डिसेंबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. त्यानुसार संबंधित जिल्हे/विभागामध्ये तत्काळ प्रभावाने आदर्श आचार संहिता लागू करण्यात आलेली आहे.

स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून निवडून आलेले 6 सदस्य रामदास गंगाराम कदम (मुंबई मतदारसंघ), अशोक अर्जुनराव उर्फ भाई जगताप (मुंबई), सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर), अमरीशभाई रसिकलाल पटेल (धुळे तथा नंदूरबार), गोपीकिसन राधाकिसन बाजोरिया (अकोला तथा बुलढाणा तथा वाशिम) आणि गिरीषचंद्र बच्छराज व्यास (नागपूर मतदारसंघ) यांची 1 जानेवारी 2022 रोजी सदस्यत्वाची मुदत समाप्त होत आहे.

या निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

  • निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्याचा दिनांक – 16 नोव्हेंबर 2021 (मंगळवार),
  • नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अखेरचा दिनांक – 23 नोव्हेंबर 2021 (मंगळवार),
  • नामनिर्देशन पत्रांची छाननी – 24 नोव्हेंबर 2021 (बुधवार),
  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 26 नोव्हेंबर 2021 (शुक्रवार),
  • मतदानाचा दिनांक – 10 डिसेंबर 2021 (शुक्रवार),
  • मतदानाची वेळ – सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत,
  • मतमोजणीचा दिनांक – 14 डिसेंबर 2021 (मंगळवार)
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक – 16 डिसेंबर 2021 (गुरूवार).