महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन

गुहागर नगराध्यक्षांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • गुहागर, 22 ऑक्टोबर 2021

महाविकास आघाडीच्या माध्यमातून कोकणचा विकास करण्याची आमची भूमिका आहे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.

गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष राजेश बेंडल ,माजी उपनगराध्यक्षा स्नेहा बागडे, प्रदीप बेंडल यांनी आपल्या समर्थकांसह गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी पवार बोलत होते.

या पक्षप्रवेशामुळे नवे चेहरे आपल्याला मिळाले आहेत. जुन्या- नव्या नेत्यांचा योग्य समन्वय घडवून पक्ष वाढीचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहनही अजित पवार यांनी केले.

Other Video On Youtube

कोकणात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी  अनेक निर्णय घेतले. कोकण रेल्वे होण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांचे कोकणावर अपार प्रेम आहे. कोकणाचा कुठलाही प्रश्न आला तर कोकणवासियांना सहकार्याची भावना ठेवा अशी त्यांच्या आम्हाला सूचना असतात, असेही अजित पवार म्हणाले.

कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट झाला पाहिजे, असा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. यापुढे चिपळूण , दापोली, गुहागर या पट्ट्यातील अनेक नेते, कार्यकर्ते पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली.

Other Video On Youtube

राष्ट्रवादी हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना न्याय देण्याची आमची भूमिका असते. पुढील आठवड्यात राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा कोकणात येणार आहे. त्यावेळी कोकणातील कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा करु असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार सुनिल तटकरे,राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

==================================================

  • इतर बातम्यांवरही दृष्टिक्षेप