नेरूळला इंटकची केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने

नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

  • अविरत वाटचाल न्यूजनेटवर्क
  • नवी मुंबई, 28 सप्टेंबर 2021

नवी मुंबई : केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कामगारविरोधी व शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आज डाव्या आघाडीने पुकारलेल्या बंदला कॉंग्रेसनेही पाठिंबा दिला, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ नेरूळ येथे नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी व रहीवाशांनी रस्त्यावर उतरत आंदोलन व निदर्शने केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी करत कामगारांनी आपला संताप व्यक्त केला.

नेरूळ सेक्टर दोन येथील कॉंग्रेसच्या मध्यवर्ती कार्यालयासमोरील रस्त्यावर झालोल्या निदर्शनात नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत, महाराष्ट्र कॉंग्रेसच्या प्रवक्त्या लीना लिमये, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसच्या सचिव विद्या भांडेकर, ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, नवी मुंबई ओबीसी सेल अध्यक्ष संतोष सुतार, प्रभाग ८५ चे वॉर्ड अध्यक्ष हितेश तांबे, डॉ. नूर, नेरुळ ब्लॉक काँग्रेस सचिव दिनेश गवळी यांच्यासह कॉंग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कामगारांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.

=========================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप