परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 25 सप्टेंबर 2021
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाच्या “स्मार्ट कार्ड ” योजनेला 30 सष्टेंबर 2021पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तथापि सध्याची कोव्हीड -19 ची परिस्थिती लक्षात घेऊन, सदर योजनेला 31 डिसेंबर,2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अड. अनिल परब यांनी दिली आहे.
महाराष्ट्र् शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून सुमारे 29 विविध सामाजिक घटकांना 33 टक्के पासून 100 टक्के पर्यंत प्रवासी भाड्यामध्ये सवलत देते. या सवलत योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित लाभार्थींना आधार क्रमांकाशी निगडीत असलेल्या ” स्मार्ट कार्ड ” काढण्याची योजना एसटीने सुरू केली आहे. त्यानुसार एसटीच्या प्रत्येक आगारामध्ये ज्येष्ठ नागरिक व अन्य सवलत धारकांना स्मार्ट कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने गर्दी होणारे कार्यक्रम उपक्रम राबविले जाऊ नये, असे निर्देश दिले असल्याने तसेच अनेक जेष्ठ प्रवाशांना आगारात येऊन स्मार्टकार्ड घेणे शक्य नसल्याने सदर योजनेला पुढील 3 महिने, म्हणजेच 31 डिसेंबर,2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती मंत्री,परब यांनी दिली आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सवलत लागू राहणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे.
=====================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप