- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, १० सप्टेंबर २०२१
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेवून मध्य रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर आणखी नवीन गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पनवेल ते मडगाव दरम्यान दोन्ही मार्गांवर या विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
Other Video On YouTube
१ ) गाडी क्रमांक ०१५८२/०१५८१ मडगाव-पनवेल- मडगाव विशेष (पूर्ण आरक्षित)
- गाडी क्रमांक ०१५८२ मडगाव-पनवेल ही गाडी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ५.२० ला मडगावहून सुटेल आण त्याच दिवशी संध्याकाळी ५.२०ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५८१ पनवेल- मडगाव ही गाडी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ६.५० ला पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८ वाजता मडगाव स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ , सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलवडे, आडिवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, माणगाव आणि रोहा स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
डब्यांची रचना
या गाड्यांना प्रत्येकी १५ स्लीपर कोच, ३ सिटींग कोच असणार आहेत.
Other Video On YouTube
२) गाडी क्रमांक ०१५८३/०१५८४ पनवेल- रत्नागिरी- पनवेल विशेष (पूर्ण आरक्षित)
- गाडी क्रमांक ०१५८३पनवेल- रत्नागिरी ही गाडी १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पनवेलहून सुटेल आणि दुस्ऱ्या दिवशी मध्यरात्री २ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५८४ रत्नागिरी- पनवेल ही गाडी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० ला रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ५.२० ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर स्थानकात थांबा देण्यात येईल.
डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना प्रत्येकी १५ स्लीपर कोच आणि ३ सिटींग कोच असणार आहेत.
Other Video On YouTube
३)गाडी क्रमांक ०१५८५/०१५८६ पनवेल- कुडाळ- पनवेल विशेष (पूर्ण आरक्षित)
- गाडी क्रमांक ०१५८५पनवेल- कुडाळ ही गाडी १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता कुडाळला पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५८६ कुडाळ- पनवेल ही गाडी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.५० ला कुडाळहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.
गाड्यांचे थांबे
या विशेष गाड्यांना रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेशेवर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड,कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
डब्यांची रचना
या विशेष गाड्यांना प्रत्येकी १५ स्लीपर कोच आणि ३ सिटींग कोच असणार आहेत.
Other Video On YouTube
४) गाडी क्रमांक ०१५८७/०१५८८ मडगाव- पनवेल- मडगाव विशेष (पूर्ण आरक्षित)
- गाडी क्रमांक ०१५८८ मडगाव- पनवेल ही गाडी १६ सप्टेंबर रोजी दुपारी २.४० ला मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २.५० ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५८७ पनवेल- मडगाव ही गाडी १९ सप्टेंबर रोजी दुपारी २.४० ला मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २.५० ला पनवेल स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलवडे, आडीवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
डब्यांची रचना
या गाड्यांना प्रत्येकी १८ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत.
Other Video On YouTube
५) गाडी क्रमांक ०१५८९/०१५९० पनवेल- रत्नागिरी-पनवेल विशेष (पूर्ण आरक्षित)
- गाडी क्रमांक ०१५८९पनवेल- रत्नागिरी ही गाडी १७ सप्टेंबर रोजी सकाळी ४.४५ ला पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५९० रत्नागिरी-पनवेल ही गाडी १७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१० वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्थानकांत थांबा देण्यात आला आहे.
गाडीचे डबे
या विशेष गाड्यांना १८ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत.
गणपती विशेष ः
गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडया धावणार
गणेशोत्सवासाठी मुंबई- कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष गाड्या
६) गाडी क्रमांक ०१५९१ / ०१५९२ पनवेल-रत्नागिरी-पनवेल विशेष गाडी
- गाडी क्रमांक ०१५९१ ही विशेष गाडी १८ सप्टेंबर रोजी रात्री १२.१५ वाजता पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ७ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५९२ ही गाडी १८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि रात्री ७.१५ वाजता पनवेलला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाड्यांना रोहा,माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
गाडीचे डबे
या विशेष गाड्यांना प्रत्येकी १८ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत.
7) गाडी क्रमांक ०१५९३ /०१५९४ पनवेल- कुडाळ-पनवेल
- गाडी क्रमांक ०१५९३ ही गाडी १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० ला पनवेलहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता कुडाळला पोहोचेल.
- गाडी क्रमांक ०१५९४ ही हाडी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता कुडाळहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ७.१५ ला पनवेलला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाड्यांना रोहा,माणगाव, खेड, चिपळुण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापुर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणवकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
गाडीचे डबे
या विशेष गाडीला १८ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत.
Other Video On YouTube
८) गाडी क्रमांक ०१५९६/०१५९५ मडगाव- पनवेल-मडगाव
- गाडी क्रमांक ०१५९६मडगाव- पनवेल ही गाडी १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ४.४० ला पनवेलला पोहोचले.
- गाडी क्रमांक ०१५९५ पनवेल-मगडाव ही गाडी २० सप्टेंबर रोजी सकाळी ५.३५ ला पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी ६.४५ ला मडगावला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाड्यांना करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापुर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा स्थानकात थांबा देण्यात येणार आहे.
गाडीचे डबे
या गाड्यांना फर्स्ट एसी १ , २ टायर २, ३ टायर ६, स्लीपर ६, सेकंड सिटींग ४ असे डबे जोडण्यात येणार आहेत.
Other Video On YouTube
९) गाडी क्रमांक ०१५९८ मडगाव- उधना सुपरफास्ट विशेष
- गाडी क्रमांक ०१५९८ मडगाव- उधना सुपरफास्ट विशेष ही गाडी २० सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० ला मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ५ वाजता उधना स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाडीला करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, वसई रोड, पालघर, वापी, वलसाड आणि नवसारी या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
गाडीचे डबे
या गाडीला १५ स्लीपर आणि ३ सेकंड सिटींग कोच जोडले जातील.
Other Video On YouTube
१०) गाडी क्रमांक ०१५९९ मडगाव-बिलासपुर विशेष
- गाडी क्रमांक ०१५९९ मडगाव-बिलासपुर ही २१ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता मडगाहून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ३.१० ला बिलासपुर स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाडीला करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापुर रो, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळुण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल, कल्याण ज., इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपुर, गोंदीया, दुर्ग, रायपुर स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
गाडीचे डबे
या गाडील १८ स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत.
या गणपती विशेष गाड्यांबद्दल अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधण्याच आहवान रेल्वे प्रशासनाने केले आहे.
======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप