इलेक्ट्रॉनिकच्या शोरुममधून लॅपटॉप चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक

मुंबई,नवी मुंबई,  नवी दिल्लीतील क्रोमा, विजय सेल्स, रिलायन्स डिजिटल्स आदी दुकानांमध्ये चोरी केल्याचे उघड

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ७ सप्टेंबर २०२१

नवी मुंबई, मुंबई शहर, ठाणे व नवी दिल्ली या शहरामधील कोमा, विजय सेल्स्, रिलायन्स डिजीटल, किंग्ज अशा इलेक्टॉनिक शोरूममधुन डिसप्लेसाठी ठेववेल्या लॅपटॉपची चोरी करणा-या राजस्थान येथील दोन चोरट्यांना नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष २ पनवेल यांनी अटक केली आहे. या आरोपींकडून १२ लाख १० हजार ३३७ रुपये  किंमतीचे ८ लॅपटॉप व गुन्ह्यात वापरलेली अॅल्टो कार हस्तगत केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे धर्मसिंह चौथीलाल मिना, वय-३८ वर्षे, रा.लि. पिलोदा, ता. गंगापुर, सवाई माधोपुर, राज्य-राजस्थान आणि आशिषकुमार रामहरी मिना, वय-२६ वर्षे, रा.ठि. रोशी, ता.नादौती, जि. करोली, राज्य-राजस्थान अशी असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

Other Video On YouTube

१७ ऑगस्ट २०२१ रोजी नवी मुंबई आयुक्तालयापासून काही तासाच्या अंतरावर पनवेल शहरातील विजय सेल्स् व सीबीडी बेलापुर येथील कोमा इलेक्ट्रॉनिक्स या शोरूममधुन डेमोसाठी ठेवलेले ३ लॅपटॉप चोरी झाल्याबाबत पनवेल शहर पोलीस ठाणे व सीबीडी बेलापुर पोलीस ठाणे येथे गुन्हे नोंद झाले होते. १६ ऑगस्ट रोजी एकाच दिवशी बोरीवली पोलीस ठाणे मुंबईच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या अशा ३ इलेक्टॉनिक शोरुमधुन ३ लॅपटॉप व चितळसर मानपाडा पोलीस ठाणे, ठाणे शहर हद्दीतुन १ लॅपटॉप चोरी झाल्याबाबत असे एकुण ४ गुन्हे नोंद झाले होते. तपासाअंती या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या आरोपींविरोधीत शहर पोलीस ठाणे गुर.नं. ४५३/२०२१ भादवि कलम ३८०, ३४ नुसार गुन्हा नोंदवून १ सप्टेंबर रोजी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना ८ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

Other Video On YouTube

  • तपास करणारे पोलीस पथक

या गुन्हयांच्या तपास व.पो.नि. गिरीधर गोरे, स.पो.नि. संदीप गायकवाड, पोलीस उप निरीक्षक वैभव रोंगे, स.फौ. सुनिल सांळुके, स.फौ. सुदाम पाटील, पो.हवा. १३३९/प्रशात काट २७००/ सुनिल कुदळे, पोहवा ४२०/सचिन पवार, पोहवा १०३४/ज्ञानेश्वर वाघ, पोहवा ४४/तुकाराम सुर्य १३०६/मनोज जानराव, पोहवा १७३२/अनिल पाटील, पोहवा १९३०/राजु बैकर, पोना ४४१३/आजि पोना २००५/सचिन म्हात्रे, पोना २०८२/इंद्रजित कान आदींच्या पथकाने केल्याची माहिती  नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.

======================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप