- नवी मुंबई, 3 सप्टेंबर 2021
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेवून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळ्यात तात्पुरत्या बंद ठेवलेल्या काही गाड्यांची सेवा पुर्ववत करण्याचा निर्णय रेल्वे प्रसासनाने घेतला आहे. 6 ते 1 ऑक्टोबर या काळात धावणाऱ्या या गाड्यांमध्ये रत्नागिरी-दिवा जंक्शन-रत्नागिरी पॅसेंजर, रत्नागिरी- मडगाव एक्सप्रेस, सावंतवाडी दिवा, मडगाव- सावंतवाडी आदी गाड्यांचा समावेश आहे.
गाडी क्रमांक 01504/01503 रत्नागिरी- दिवा जं.- रत्नागिरी आरक्षित पॅसेंजर विशेष
- गाडी क्रमांक 01504 रत्नागिरी- दिवा जं.- रत्नागिरी आरक्षित पॅसेंजर विशेष गाडी 7 ते 30 सप्टेंबर या काळात पहाटे 5.30 वाजता रत्नागिरीहून सुटेल आणि त्याचदिवशी दुपारी 1.35 ला दिवा जंक्शन स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01503 रत्नागिरी- दिवा जं.- रत्नागिरी आरक्षित पॅसेंजर विशेष गाडी 7 ते 30 सप्टेंबर या काळात दुपारी 3.30 वाजता दिव्याहून सुटेल आणि मध्यरात्री 12.20 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना भोके, उक्शी, संगमेश्वर रोड, कडवाई, आरवली रोड, सावर्डे, कामठे, चिपळुण, अंजनी, खेड, कळंबानी बुद्रुक, दिवानखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने ,वीर, गोरेगाव रोड, माणगाव,इंदापूर रोड, कोलाड, रोहा, जिते, आपटा आणि पनवेल स्थानकात थांबे देण्यात येणार आहे.
डब्यांची रचना
या विशेष आरक्षित गाड्यांना 14 आसन व्यवस्था असलेले डबे जोडण्यात येणार आहेत.
Other Video On YouTube
गाडी क्रमांक 01501/01502 रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी एक्सप्रेस विशेष
- गाडी क्रमांक 01501 रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी एक्सप्रेस विशेष ही गाडी 6 ते 29 सप्टेंबर या काळात मध्यरात्री 1.40 ला रत्नागिरीहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 8.50 ला मडगाव स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01502 रत्नागिरी-मडगाव-रत्नागिरी एक्सप्रेस विशेष ही विशेष गाडी 6 ते 29 सप्टेंबर या काळात संध्याकाळी 7.40 ला मडगावहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 1 वाजता रत्नागिरी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना राजापुर रोड, वैभवाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप, सावंतवाडी रोड, मडुरे, पेडणे, थिविम, करमाळी आणि वेर्णा स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे.
डब्यांची रचना
या विशेष आरक्षित गाड्यांना 14 आसन व्यवस्था असलेले डबे जोडण्यात येणार आहेत.
Other Video On YouTube
गाडी क्रमांक 01508/01507 मडगाव सावंतवाडी-मडगाव आरक्षित एक्सप्रेस विशेष
- गाडी क्रमांक 01508 मडगाव सावंतवाडी-मडगाव आरक्षित एक्सप्रेस विशेष ही गाडी 7 ते 30 सप्टेंबर या काळात सकाळी 6.25 ला मडगावहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 8.15 ला सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01507 मडगाव सावंतवाडी-मडगाव आरक्षित एक्सप्रेस विशेष ही गाडी 7 ते 30 सप्टेंबर या काळात सायंकाळी 7 वाजता सावंतवाडी रोडहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9.20 वाजता मडगावला पोहोचेल.
गाडीचे थांबे
या विशेष गाड्यांना सुरावली, माजोर्डा, वेर्णा, करमाळी, थिविम, पेडणए आणि मडुरे या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
डब्यांची रचना
14 आसनक्षमता असलेले डबे या विशेष गाड्यांना जोडण्यात येणार आहेत.
गाडी क्रमांक 01506/01505 सावंतवाडी -दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस
- गाडी क्रमांक 01506 सावंतवाडी -दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस ही गाडी 7 ते 30 सप्टेंबर या काळात सकाळी 8.20 ला सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता दिवा स्थानकात पोहोचेल.
- गाडी क्रमांक 01505 सावंतवाडी -दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस ही गाडी 7 ते 1 ऑक्टोबर या काळात सकाळी 6.55 ला दिवा स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 6.55 ला सावंतवाडी स्थानकात पोहोचेल.
गाडीचे थांबे
या गाड्यांना झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, अचिर्णे, वैभववाडी रोड, खारेपाटण रोड, राजापुर रोड, सोंदळ, विलवडे, वेरावली, आडवली, निवसर, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डे, चिपळुण, खेड, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, रोहा जिते, आपटे, पनवेल आणि कळंबोली स्थानकांत थांबा देण्यात येणा आहे.
डब्यांची रचना
14 आसनक्षमता असलेले डबे या विशेष गाड्यांना जोडण्यात येणार आहेत.
सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात राज्य तसेच केंद्र सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
=====================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप