- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- मुंबई, 2 सप्टेंबर 2021
मध्य रेल्वेने श्रीगणेश उत्सवानिमित्त होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई आणि कुडाळ दरम्यान वातानुकूलित विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
- गाड्यांचा तपशिल
01269 विशेष वातानुकूलित लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. ७.९.२०२१, ८.९.२०२१, ९.९.२०२१ आणि १०.९.२०२१ रोजी ०४.३५ वाजता सुटेल आणि कुडाळला त्याच दिवशी १४.३० वाजता पोहोचेल.
01270 विशेष वातानुकूलित कुडाळ येथून दि. ७.९.२०२१, ८.९.२०२१, ९.९.२०२१ आणि १०.९.२०२१ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.
Other Video On YouTube
- गाडय़ांचे थांबे
ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली आणि सिंधुदुर्ग.
- डब्यांची रचना
१ प्रथम वातानुकूलित, ४ द्वितीय वातानुकूलित, १३ तृतीय वातानुकूलित, आणि एक पेंट्री कार.
- आरक्षण
पूर्णपणे आरक्षित विशेष ट्रेन क्र. 01269 /01270 विशेष शुल्कासह दि. ४.९.२०२१ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
Other Video On YouTube
वरील विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करावे.
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच बोर्डिंग, प्रवास आणि गंतव्यस्थानादरम्यान कोविड १९ शी संबंधित एसओपी, सर्व निकषांचे पालन करून या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप