- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 2 ऑगस्ट 2021
अतिवृष्टीमुळे कोकणात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे सर्वसामान्यांचे अतोनात हाल झाले असून अनेक निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागला आहे. या नैसर्गिक आपत्तीसाठी झुंजणाऱ्या कोकणवासियांच्या मदतीला अनेक हात धावले आहेत. नवी मुंबईतून समाजसेवक अमित मढवी आणि निलम मढवी या दाम्पत्याने 1 ऑगस्ट रोजी जीवनावश्यक वस्तूंचा साठा घेवून ट्रक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठविला. तसेच अजून काही मदत लागल्यास आपण तातडीने त्याची पूर्तता करू, असे आश्वासन अमित आणि निलम मढवी यांनी कोकणवासियांना दिले आहे.
जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणात विशेषतः चिपळुण, खेड आदी परिसरात पुराने थैमान घातले. मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून असंख्य निष्पापांचा जीव गेला. अनेकांचे संसार मातीत मिळाले. त्यामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांना मदत देणे आपले कर्तव्य असल्याचे समाजसेविका निलम मढवी यांनी सांगितले.
Other Video on Youtube
यावेळी माजी नगरसेवक विनोद विनायक म्हात्रे, समाजसेवक अमित मढवी, समाजसेविका निलम मढवी, माजी नगरसेवक सुधारकर म्हात्रे, सुगंध तांडेल, सुभाष भोईर, बाबाजी तांडेल, राम भोईर, विवेक तांडेल, श्रीधर तांडेल, जीवन तांडेल, महादेव म्हात्रे, हरींचंद्र तांडेल,दिनानाथ मढवी, साईनाथ भोईर, बाबुराव म्हात्रे(नाना), दत्तात्रेय भोईर, रमेश तांडेल , सुनिल तांडेल, जगदिश तांडेल, यतीन भोईर, आदी मान्यवर उपस्थित होते.
Other Video on Youtube
कोरोना काळातही मढवी दाम्पत्याने अनेक गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले होते. शिवाय मोफत औषध फवारणी, आर्सेनिकच्या गोळ्यांचे वाटप याचबरोबर अनेक गरजूंना मदतीचा हातही दिला होता.
Other Video on Youtube
दरम्यान, अमित आणि निलम मढवी यांच्या सेवाभावी वृत्तीचा ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनीही कैतुक केले आहे.
=======================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप