महागाईविरोधात नवी मुंबईत धक्का मारो आंदोलन

दरवाढ मागे घेण्याची बहुजन मुक्ति पार्टीची मागणी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 जून 2021:

कोविड महामारीच्या संकटामुळे एकीकडे सामान्यांचे आर्थिक बजेट कोसळले असतानाच महागाईमध्येही वाढ होत आहे. या वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी बहुजन मुक्ति पार्टीच्या वतीने 15 जून रोजी बेलापूर इथल्या कोकण विभागीय कार्यालयासमोर धक्का मारो आंदोलन करण्यात आले.

पेट्रोल, डिझेल, गॅसच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती कमी करा, खाद्यतेल तसेच जीवनावश्यक खाद्यपदार्थांचे भाव कमी करा, विज बील माफी या प्रमुख मागण्या यावेळी बहुजन मुक्ति पार्टी युवा आघाडी, महिला आघाडीच्या वतीने करण्यात आल्या. आंदोलकांकडून आपल्या मागण्यांचे निवेदन कोकण विभागीय आयुक्तांनाही देण्यात आले.

पेट्रोल दरवाढ झाल्यामुळेच गाड्यांना धक्का माराण्याचं हे आंदोलन केल्याची माहिती नवी मुंबई बहुजन मुक्ती पार्टी चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश कांबळे यांनी दिली. यावेळी महीला आघाडीच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्ष स्नेहल गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष विनोद इंगळे, राष्ट्रिय मुलनिवासी महीला संघ नवी मुंबईच्या सुजाता आव्हाड, अलका मेलिनमनी, स्वप्निल लांजेकर(विद्यार्थी मोर्चा न.मु.) हरविंदरसिंग खालसा (राष्ट्रिय ख्रिश्चन मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष) संजय माळी (RMBKS), प्रशांत गायकवाड, सुमन अंभोरे,धम्मपाल इंगोले,दत्ता गायकवाड, संगिता धसाडे,वैजंता कोकाटे, कविता गायकवाड, सुनंदा माळी,विद्या गायकवाड, बाबासाहेब भवरे,रेश्मा सोनावणे,बालिका गायकवाड, भाग्यश्री सोनकांबळे आदि उपस्थित होते.

——————————————————————————————————