गेल्या 24 तासात 84,332 नवीन रुग्णांची नोंद, 70 दिवसातला नीचांक
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, 12 जून 2021:
देशभरात गेल्या 24 तासात 84,332 इतकी नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. देशात आता सलग 5 व्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येची नोंद 1 लाखांपेक्षा कमी झाली आहे. भारतातील सक्रीय रुग्णसंख्येत सातत्याने घसरण होत आहे. सध्या देशातील सक्रीय रुग्णसंख्या 10,80,690 इतकी आहे. सलग बाराव्या दिवशी ती 20 लाखांपेक्षा कमी आहे.
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत एकूण 40,981 ने घट झाली आणि देशाच्या एकूण बाधित रुग्णसंख्येच्या ती केवळ 3.68 टक्के इतकी आहे.
कोविड संसर्गातून मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. देशात सलग 30 व्या दिवशी दैनंदिन नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील 24 तासात 1,21,311 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. दैनंदिन नव्या रुग्णांच्या तुलनेत 36,979 आणखी रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत.
महामारीच्या प्रारंभापासून कोविड – 19 संसर्ग झालेल्यांपैकी 2,79,11,384 लोक बरे झाले आहेत. तर मागील 24 तासात 1,21,311 रुग्ण बरे झाले. त्यामुळे बरे होणाऱ्यांचा कल वाढता असून बरे होण्याचा एकूण दर 95.07 % वर पोहोचला आहे.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटीमध्ये घसरणीचा कल कायम आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.94 % इतका, तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 4.39% टक्के इतका आहे. सलग 19 व्या दिवशी तो 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.
========================================================
- मागील बातम्यांवरही दृष्टक्षेप