मुंबईत पोलिस दलात अत्याधुनिक एटीव्ही वाहनं

जमीन, रेती, दलदलीचा भाग, वालुकामय भागांतही गस्तीसाठी उपयुक्त

  • अवित वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 7 जून 2021:

मुंबई पोलीस दलात आज अत्याधुनिक अशा 10 एटीव्ही (ऑल टिरेन व्हेईकल्स) वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई शहरातील नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालण्यासाठी विशेषतः चौपाटी परिसरातील गस्तीसाठी सुसज्ज असलेल्या ही वाहने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत मुंबई पोलीस दलाला प्रदान करण्यात आली.  रिलायन्स फाऊंडेशनच्यावतीने ही वाहने देण्यात आली आहेत.

ATV वाहनांचे वैशिष्ट्यं

या वाहनाला सर्वपृष्ठीय वाहन असे म्हणू शकतो. एखादी अघटीत घटना घडल्यास तत्काळ मदतीसाठी पोहचण्यासाठी या वाहनाचा वापर करता येतो. त्यासाठी ही वाहने मुंबई पोलीसांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. हे एक सर्व समावेशक असे वाहन आहे. ते जमीन, रेती, दलदलीचा भाग, वालुकामय अशा सर्व पृष्ठभागावर चालते. त्यामुळे चौपाटी परिसरात याचा वापर करता येऊ शकतो. वाहनाची ५७० सीसी अशी उच्च क्षमता आहे. त्यामुळे ते वेगवानही आहे. बंदोबस्तावरील चार जण या वाहनातून गस्त घालू शकतात. आणीबाणीच्या प्रसंगी वाहनातील दोरखंड, तरंगते हूक्स (Floating Hooks) अशा सुविधांचाही वापर करता येऊ शकतो.
——————————————————————————————————